Mon, Jul 06, 2020 18:19होमपेज › Marathwada › वसमतमध्ये एकाचा खून

वसमतमध्ये एकाचा खून

Published On: May 21 2019 1:49AM | Last Updated: May 21 2019 1:49AM
वसमत : प्रतिनिधी 

येथील कृषी केंद्र चालकाने शेतकर्‍याकडे उधारी मागितल्याने झालेल्या हाणामारीत केंद्र चालकाचा चाकू भोसकल्याने खून झाल्याची घटना वसमत येथील माळवटा पाटीजवळ सोमवारी (दि.20) दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. 

वसमत येथे नवनाथ गोविंदराव नादरे यांचे रोहित कृषी केंद्र आहे. या कृषी केंद्रावरून माळवटा येथील एकाने साहित्य खरेदी केलेे होते, परंतु त्याचे पैसे परत दिले नव्हते. पैसे वसूल करण्यासाठी नवनाथ सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास माळवटा पाटीवर गेले होते. या दरम्यान संबंधित व्यक्‍तीसोबत त्यांचा उधारी देण्यावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर नवनाथ यांच्या पोटात चाकू लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. घटनास्थळावरून त्यांना वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.