सोनपेठ (परभणी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील खडका येथे ३ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास विवाहितेचा विनयभंग केल्याची घटना घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून सोनपेठ पोलिस ठाण्यात चार डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील खडका येथील पीडित विवाहिता आपल्या मुलासह ३ डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास असताना योगेश मेंडके याने घराची कडी वाजवुन पीडितेच्या नावाने आवाज दिला. पीडित विवाहितेने घराचा दरवाजा उघडला त्यावेळी योगेश मेंडके याने पीडितेचा विनयभंग केला.
पीडित विवाहिता जोरात ओरडली असता योगेश मेंडके तिथून पळून गेला. पीडित विवाहितेच्या फिर्यादीवरून योगेश मेडके यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल आत्माराम पवार हे करत आहेत.