Sun, Jul 05, 2020 02:24होमपेज › Marathwada › सोनपेठ तालुक्यातील चौथ्या शिक्षकांचे निलंबन

सोनपेठ तालुक्यातील चौथ्या शिक्षकांचे निलंबन

Published On: May 15 2019 5:28PM | Last Updated: May 15 2019 5:25PM
सोनपेठ:- प्रतिनिधी

सोनपेठ तालुक्यातील शिक्षकांच्या निलंबनाची साखळीच तयार होताना दिसत आहे. अजून एका मुख्याध्यापकाचे निलंबन झाल्यामुळे अजून किती शिल्लक अशी चर्चा होत आहे.

विद्यार्थ्यांना शिकवणीतून ज्ञानाचे धडे शिकवणा-या शिक्षकांच्या निलंबनामुळे तालुक्यातील शिक्षक वर्गात चांगलीच तारांबळ उडाली आहे. संबंधित अधिका-याच्या आदेशावरुन तालुक्यातील चौथा शिक्षक ही निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. धनादेश अनादर प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन शिक्षा भोगणाऱ्या शिक्षकाला अखेर शिक्षण विभागाने निलंबित केले आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागातील आता चौथ्या शिक्षकावर कारवाई झाल्यामुळे शिक्षण विभाग चांगलाच धास्तावल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील खडका येथील जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक सय्यद पाशा यांनी सोनपेठ येथील संत गजानन जिल्हा परिषद पतसंस्था  सोनपेठ यांना दिलेला धनादेश बाऊन्स झाल्यामुळे त्यांनी २०१३ मध्ये फिर्याद दाखल दिली होती. याप्रकरणात अनेकदा गैरहजर राहिल्याने सोनपेठ येथील न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामध्ये चौदा दिवस सय्यद पाशा हे गैरहजर राहिल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केले आहे. 

शिक्षकाच्या निलंबनामुळे आता तालुक्यातील चौथ्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्यामुळे शिक्षण विभागातील कर्मचारी चांगलेच धास्तावल्याचे दिसत आहे. तर आणखी कामचुकारपणा व अन्य काही कारणास्तव निलंबनाचे शिक्षक किती...? असा प्रश्न जनतेला पडला आहे.