होमपेज › Marathwada › लातूर : टँकर विहिरीत कोसळून चालक ठार 

लातूर : टँकर विहिरीत कोसळून चालक ठार 

Published On: Sep 16 2019 11:35PM | Last Updated: Sep 17 2019 1:54AM
लातूर : प्रतिनिधी 

पाणी विहिरीत टाकण्यासाठी विहिरीकाठी ट्रॅक्टर रिव्हर्स घेत असताना तोल गेल्याने पाण्याच्या टाकीसह पन्नास फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर कोसळले. यात ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला. लातूर तालुक्यातील ममदापूर शिवारात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुकाराम नेहरू बेले (वय ३५) असे ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.

ममदापूर येथील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतात कोथिंबिरीचे पीक घेतले आहे. विहिरीत पाणी नसल्याने लातूरहून टॅंकरने पाणी आणले जाते व ते विहिरीत टाकून पुन्हा विद्युत मोटारीने  कोथिंबिरीच्या पिकाला दिले जाते. नेहमीप्रमाणे ट्रॅक्टरचालक लातूरहून पाणी घेऊन आला होता ते पाणी टाकण्यासाठी ट्रॅक्टर विहिरीजवळ रिव्हर्स घेत असताना व्हेरी काठाचा अंदाज त्याला आला नाही. शिवाय चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर विहिरीत  कोसळले. 

दरम्यान, घटनेची माहिती कळताच लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि भाऊसाहेब बुड्डे पाटील ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. अंधार असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता त्यामुळे फोकस लावण्यात आला व क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर पाण्याची टाकी व प्रेत बाहेर काढण्यात आल्याचे बुड्डे पाटील यांनी सांगितले.