Wed, Jul 08, 2020 16:33होमपेज › Marathwada › शक्ती केंद्रप्रमुख संमेलनासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आज लातुरात

शक्ती केंद्रप्रमुख संमेलनासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आज लातुरात

Published On: Jan 06 2019 5:52PM | Last Updated: Jan 06 2019 5:52PM
लातूर : प्रतिनिधी 

लातूर येथे आयोजित भाजपाच्या बुथ विजय अभियान व शक्ती केंद्रप्रमुख संमेलनासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज लातुरात आले आहेत. आज रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अमित शहा आणि   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातुरातील थोरमोटे लॉन्स वर आगमन झाले.

मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार ७१३ बूथ व शक्ती केंद्रप्रमुख साठी हे संमेलन शिबिर आहे. सकाळ पासून संमेलनास सुरुवात झाली असून, पहिले सत्र भाजपचे संघटनमंत्री विजय पुरानीक यांनी घेतले. दुसऱ्या सत्रात शहा संबोधित करणार आहेत. संमेलन स्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून, निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. पत्रकारांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. या संमेलनासाठी अनेक मंत्री लातूरात आले आहेत. हे संमेलन शक्ती केंद्रप्रमुखांचे असले तरी अमित शहा यांची सभा असल्याचे समजून भाजपचे हजारो कार्यकर्ते थोरमोटे लॉन्स परिसरात दाखल झाले होते. तथापी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. यात भाजपाच्या काही नगरसेवकांचाही समावेश होता.