होमपेज › Marathwada › टकरीमध्ये विहिरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू

टकरीमध्ये विहिरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू

Published On: Jan 29 2018 1:41AM | Last Updated: Jan 29 2018 12:22AMशिरूर : प्रतिनिधी

विहिरी शेजारी एकमेकांसोबत झालेल्या टकरीत पाय घसरून विहिरीत पडलेल्या दोन काळवीटांचा मृत्यू झाला. ही घटना मातोरी (ता.शिरूर) येथे शनिवारी घडली.

मातोरी येथील शेतकरी सर्जेराव जरांगे यांच्या शेतातील विहिरीत दोन काळवीट पडून मृत्यू झाल्याची माहिती येथील सचिन गायकवाड व नितीन गायकवाड यांनी सर्पराज्ञीचे संचालक प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. सिद्धार्थ सोनवणे, सचिन गायकवाड, नितीन गायकवाड, वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव, गोकूळ आघाव, दहफीळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या दोन्ही काळवीटास बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

पशुधन विकास अधिकारी डॉ. विजय चौरे व डॉ. निलेश सानप यांनी  शवविच्छेदन केले. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या काळविटावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.