नवोदयच्या प्रवेशासाठी होणारी परीक्षेची तारिख बदलली, परिक्षा होणार २४ फेब्रुवारीला 

Last Updated: Jan 14 2021 4:59PM
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा 

जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील नववी वर्गाच्या नवीन प्रवेशासाठी होणारी परीक्षेची तारिख बदलण्यात आली आहे. (jawahar Navodaya Vidyalaya, Tuljapur has changed the date of examination for new admission of Class IX) याची माहिती प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली असून आता ही प्रवेश परीक्षा फेब्रुवारीत घेण्यात येणार आहे. 

वाचा : नांदेड : लोहा : तर 'त्या' ४६ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार

जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथील इयत्ता नववी वर्गाच्या नवीन प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा आधी १३ फेब्रुवारी रोजी होणार होती. मात्र या तारखेला होणारी ही परीक्षा आता २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याबाबत प्राचार्य के. वाय. इंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकातून माहिती दिली आहे.