होमपेज › Marathwada › जालना : संजय अंभोरे खूनप्रकरणी ग्रामस्थ संतप्त

जालना : संजय अंभोरे खूनप्रकरणी ग्रामस्थ संतप्त

Last Updated: Oct 08 2019 9:14PM
बदनापूर : प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गौर यांना निलबिंत करुन चौकशी करावी व तात्काळ आरोपींना अटक‍ करावी, असा पवित्रा शेलगाव गावकऱ्यांनी घेऊन काल गोळीबारात मृत्यू पावलेल्या संजय अंभोरे यांचा मृत्यूदेह बदनापूर पोलिस ठाण्याच्या समोरून हलवू दिला नाही. अखेर उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी ६ नंतर मृत्यदेह सेलगाव येथे नेण्यात आला. दरम्यान सेलगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात येऊन दसरा सण असतानाही गावात चूल पेटल्या नाही.

बदनापूर तालुक्यातील शेलगाव येथे दिनांक ७ ऑक्टोबर रोजी सांयकाळी  ७.४० च्या दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये कामगार ठेकेदार असलेले संजय किसनराव अंभोरे (वय ४३ वर्षे)  यांना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून येवून जालना-औरंगाबाद महामार्गावर असलेल्या टपरीवर संजय अंभोरे यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यात संजय अंभोरे यांच्या मृत्यू झाला. 

अंभोरे यांच्यावर काही दिवसापुर्वी हल्ला झाला होता यावेळी आरोपी मदन खोलवाल, उत्तम घुणावत, सुमेरसिंग काकरलवाल, राजसिंग कलानी हे गुन्हेगार प्रवृत्ती चे असून त्यांच्याकडे गावठी कट्टा असल्याचे व त्यांच्या पासून जिवित्वास धोका असल्याचे पत्र पोलीस अधिक्षक यांना देण्यात आले होते. तो तपास स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा यांच्याकडे देण्यात आला असल्याने स्था.गु.अ.शा. पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी जाणूनबुजून तपास कामात हलगर्जी करुन आरोपींना पाठीशी घालण्याचे काम गौर यांनी केले असून त्यामुळेच माझा भाऊ संजय अंभोरे यांचा मृत्यू झाला व त्याच्या मृत्यूस पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर च जबाबदार आहे आणि त्यांना तात्काळ निलबिंत करुन चौकशी करावी असे मयत संजयचा भाऊ राजू किसनराव अंभोरे व समस्त गावकऱ्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र औरंगाबाद कळविले असून जो पर्यंत राजेंद्रसिंह गौर यांना निलबिंत करत नाही तो पर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता. दसरा सण असतानाही गावातील घडलेल्या दु:खद घटना घडल्यामुळे शेलगाव गावामध्ये सर्व व्यापाऱ्याने आपआपल्या दुकाने कडकडीत  बंद ठेवली होती, तसेच गावात एकही चूल पेटली नाही. दरम्यान राजू किसनराव अंभोरे यांनी दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, संजय किसनराव अंभोरे हे औद्योगिक वसाहत जालना येथे कामगार ठेकेदार म्हणून काम करत होते . मागील  दोन वर्षापूर्वी  औद्योगिक वसाहती मध्ये जिवघेणा हल्ला करुन जखमी केले होते त्या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात १३५/२०१७ कलम ३०७ ,१४७,१४८,१४९(ब) भादवि प्रमाणे आरोपी सुमेरसिंग काकरवाल (ठेकेदार ), उत्तम घुणावत (ठेकेदार ), मदन खोलवाल रा . सर्व राजेवाडी ता.बदनापूर ,राजसिंग कलाणी , सुनिल वणारसे वईतर यांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता व सदरचा दावा मा.जालना न्यायालयात चालू आहे. असेच सहा सात महीन्यापुर्वी संजय अंभोरे हे औद्योगिक वसाहती मध्ये काम करत असातांना महेश खरात उर्फ सोंग्या रा.जालना यानी धमकी देवून तु उत्तम घुणावत , मदन खोलवाल , सुमेरसिंग काकरवाल यांच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुला पाहुन घेईल अशी धमकी देण्यात आली होती, म्हणून वरील आरोपीनेच माझ्या भावावर  हल्ला केला असून माझ्या भावाच्या  मृत्यूस कारणीभूत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात कलम ३०२,३०७,३ ,२५ ,१२० (ब) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी सुधीर खिराडकर हे करीत आहेत.

सेलगाव येथील गावकरी सकाळपासूनच बदनापूर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसलेले होते. मृत्यदेह शवविच्छेदनानंतर औरंगाबादहून सायंकाळी पाचच्या दरम्यान आणण्यात आला यावेळी रूग्ण्वाहिका थेट बदनापूर पोलिस ठाण्याच्या प्रवेश द्वारात उभी करून  बदनापूर पोलीस ठाण्यात जो पर्यंत हल्ला केलेले आरोपींना अटक करत नाहीत व स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना निलबिंत करत नाही तो पर्यत अंत्यविधी करणार नाही अशी भुमिका शेलगाव येथिल नागरिकांनी घेतली होती त्यामुळे काही वेळ पेच निर्माण झाला. तथापि, उपविभागीय अधिकारी खिराडकर यांनी .फिर्यादिवरुन आता ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द गुन्हा दाखल केला असून इतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यासाठी तीन पथक तैनात करण्यात आली असून योग्य तपास चालू असल्याचे आश्वासन दिल्या नंतर  नातेवाईकांनी तब्बल एक तासानंतर मृत्यदेह हलवला. सेलगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता.