Sat, Dec 07, 2019 20:04होमपेज › Marathwada › लातुरात आयकर विभागाचे छापे; सराफ व्यावसायिक रडारवर  

लातुरात आयकर विभागाचे छापे

Published On: Jan 22 2019 8:41AM | Last Updated: Jan 22 2019 9:06AM
लातूर :  प्रतिनिधी

लातुरातील तीन सराफा दुकानांसह अन्य दोन दुकानावर आयकर विभागाच्या पथकाने सॊमवारी एकाच वेळी छापे टाकले. दुकानातील व्यवहाराची  माहिती लपवली जात असल्यामुळे ही कार्यवाही करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, रेनापुर तालुक्यातील पानगाव येथील एका व्यापार्‍याच्या दुकानावर छापा टाकण्यात आला आहे. 

कार्यवाहीत काय हाती लागले याची माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. औरंगाबाद आयकर विभागाकडून मराठवाड्यातही छापे टाकण्यात आले आहेत. यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत.