Mon, Jul 13, 2020 23:57होमपेज › Marathwada › लग्नसोहळ्यातही राजकीय नेत्यांची श्रेयवादाची लढाई

लग्नसोहळ्यातही राजकीय नेत्यांची श्रेयवादाची लढाई

Published On: Mar 20 2018 1:47AM | Last Updated: Mar 20 2018 12:38AMजाफराबाद :  ज्ञानेश्वर पाबळे

सध्या सुरू असलेल्या अनेक विवाहसोहळ्याप्रसंगी वर पिता आणि वधू पिता यांच्या आग्रहाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून राजकीय नेते लग्नसोहळ्याला हजेरी लावत आहेत. नेत्यांचा राजकीय स्वार्थ हा नेहमीचाच असतो. लग्नसोहळ्यातही राजकारण करणार्‍या नेत्यांकडून दोन्ही परिवारांकडून डझनभर अपेक्षा ठेवल्या जातात. लग्नसोहळ्याला उपस्थित राहून समाजासमोर आपला सत्कार- स्वागत व्हावे आणि वर-वधूंना शुभेच्छा देता याव्या, यासाठी पुढारी हजेरी लावत असल्याने लग्न करणार्‍याना कोणत्या राजकीय नेत्यांना बोलवावे व कुणाला बोलवू नये ही समस्या मात्र चांगलीच भेडसावू लागली आहे.

  लग्नसोहळा पार पाडणार्‍यांना लग्न व्यवस्थित व्हावे व हा सोहळा चांगला पार पडावा अशी भीती असते तर त्या गावातील काही राजकीय पुढारी केवळ वरिष्ठ राजकीय पुढार्‍यांच्या  नजरेत आपले स्थान राहावे यासाठी त्यांचा स्वागत सोहळा व त्यांना सोयीसुविधा पुरवावे हेच उद्दिष्ट त्यांच्या डोळ्यांसमोर असते. लग्नसोहळ्याला वेळेवर हजर न राहूनही लग्नसोहळा सुरू होण्यापूर्वीचा तासभर चालणारा राजकीय स्वागत सोहळ्यामुळे मात्र वर्‍हाड मंडळी  मात्र त्रस्त होत आहे.  मतदारसंघातील लग्नसोहाळ्यासाठी उपस्थित राहण्याचे मोठे आवाहन राजकीय पुढार्‍यांसमोर आहे.

 पाच वषार्र्ंत राजकीय नेत्याने डोकावूनही पाहिले नाही तरी चालते; पण आपल्या लग्न कार्यात उपस्थित राहावे यासाठी आटोकाट प्रयत्न वधू आणि वर मंडळींकडून केले जातात. एकाच दिवशी मतदारसंघात अनेक विवाह सोहळ्याचा विधी हा एकाच वेळी असल्याने कोण-कोणत्या ठिकाणी उपस्थित राहावे, असा प्रश्न त्या़ंच्यासमोर आहे.  

एखाद्या कार्यकर्त्याला सोहळ्याला उपस्थित राहणे जमले नाही तर लगेच राजकीय पुढार्यांना नाराजीला सामोरे जावे लागत आहे.  मतदारसंघात एरव्ही कधीही न फिरकणारे नेते मात्र लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रयत्नशील असतात.

 

tags : marathwada news, jafrabad,political leader, importance, marriage