Thu, Jun 04, 2020 21:00होमपेज › Marathwada › हिंगोली : मुंबई रिटर्न ६ कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोली : मुंबई रिटर्न ६ कोरोना पॉझिटिव्ह

Last Updated: May 23 2020 3:28PM
हिंगोली : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात आणखी सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. यापैकी ८९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये औंढा तालुक्यातील देवाळा येथील एक तर उर्वरित वसमत तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे. वसमत विलगीकरण सेंटरमधील हे पाच जण मुंबईवरून परतलेले आहेत. तर देवाळा येथील इसमही मुंबईवरून आला होता. औंढा येथील वैद्यकीय अधीक्षकांनी दोन दिवस त्यांची तपासणी केली नसल्याचा प्रकार घडला होता. आता या लोकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे. मात्र, गावात खबरदारी घेतली असल्याने गावात कुणाशी संपर्क आला नव्हता. 

मुंबईहून परतणारे अनेक जण पॉझिटिव्ह येत असून त्यामुळे जिल्हाभरात ग्रामस्थ सतर्क आहेत. तपासणीशिवाय अथवा शासकीय विलगीकरण केल्याशिवाय अशांना गावात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे अनेकदा वादही होत असले तरी गावाची सुरक्षा मात्र होत आहे. हॉटस्पॉट भागातून काम करून आलेल्यांनी आरोग्य तपासणी करूनच गावात जाण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.