Thu, Jul 02, 2020 18:16होमपेज › Marathwada › मराठवाड्यात आज अवकाळी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज

मराठवाड्यात आज अवकाळी बरसणार, हवामान खात्याचा अंदाज

Last Updated: Nov 06 2019 9:15AM
औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांत आज (दि. ६) वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. अवकाळी पावसाच्या फटक्याने मराठवाड्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. 

ऑक्टोबर महिना उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात रोज कमी-अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये मराठवाडा विभागात २७ मिलीमीटर अवकाळी पाऊस पडला आहे. 

गेल्या पाच दिवसांमध्ये सर्वाधिक ४१.९० मिलीमीटर पाऊस औरंगाबाद जिल्ह्यात झाला आहे. तर त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यात ४० मिलीमीटर पाऊस पडला आहे. परभणी जिल्ह्यात ३१.६८ मिलीमीटर, हिंगोली २३.७२, नांदेड १७.४३, बीड २८.१०, लातूर २६.१४, व उस्मानाबाद जिल्ह्यात १२.४० मिलीमीटर पाऊस बरसला आहे.

मराठवाडा विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी व नांदेड जिल्ह्यांमध्ये वार्षिक मोसमी पावसाची सरासरीहून अधिक पाऊस झालेला आहे. काही दिवसांमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे मराठवाडा विभागाती जिल्ह्यांती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

ऑक्टोबर महिन्यात २१९.३२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या महिन्यात ६४.९२ मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता. अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल ३३७ टक्के अधिकचा पाऊस झाला आहे.