Sat, Jul 04, 2020 02:40होमपेज › Marathwada › परभणी : चोरांचा धुमाकूळ, चार घरे फोडली

परभणी : चोरांचा धुमाकूळ, चार घरे फोडली

Published On: Oct 05 2019 11:50AM | Last Updated: Oct 05 2019 11:41AM
मानवत : प्रतिनिधी

मानवत तालुक्यातील थार येथील चार घरे चोरट्यांनी पहाटे साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास फोडली. या घरफोडीतील दोन घरांमध्ये सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास  केला आहे. 

थार येथील महेश व्यंकटराव हिरवे आणि गणेश व्यंकटराव हिरवे यांच्या घरातील सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास केला. तर  शेजारीच असणाऱ्या विठ्ठल ज्ञानोबा काळे व नागनाथ पंढरीनाथ केंद्रे याचीही घरे चोरट्यांनी फोडली. मात्र चोरट्यांच्या काहीच हाती लागले नाही. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रमेश स्वामी आणि इतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले आहेत.