होमपेज › Marathwada › जवळा बाजार येथे हार्डवेअरच्या दुकानास आग

जवळा बाजार येथे हार्डवेअरच्या दुकानास आग

Published On: Apr 19 2019 7:49AM | Last Updated: Apr 19 2019 7:49AM
जवळा बाजार : प्रतिनिधी

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील हार्डवेअरच्या दुकानास भिषण आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. 

जवळा बाजार येथील लक्ष्मण विभुते यांचे हिंगोली - परभणी महामार्गावर हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली. काही क्षणातच आग भडकल्याने यामध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घटनेत सुमारे एक कोटीवर नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

आग विझवण्यासाठी औंढा हिंगोली येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले होते. परंतु रात्री अकरा वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नव्हते. शिवाय या आगीमुळे हिंगोली परभणी मार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.