Wed, Jul 08, 2020 04:46होमपेज › Marathwada › परतीच्या पावसाने घेतला बाप-लेकाचा बळी

परतीच्या पावसाने घेतला बाप-लेकाचा बळी

Last Updated: Oct 28 2019 3:41PM

घरावरील माळवद अंगावर पडून बाप-लेकाचा जागीच मृत्यूसोनपेठ (परभणी) : प्रतिनिधी

येथील टेकाळे मोटर रिवाइंडिगचे मालक अरूण मन्मथअप्पा टेकाळे (वय ४५ वर्षे) आणि त्यांचा मुलगा मंदार अरुण टेकाळे (वय ६) झोपले होते. दि. २८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान घरावरील माळवद अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत अरुण टेकाळे यांच्या पत्नी सौ. कस्तूर टेकाळे या जखमी झाल्या असून पुढील उपचारासाठी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे दाखल करण्यात आले आहे.

सोनपेठ शहर व तालुक्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान मांडले आहे. जवळपास पूर्ण पावसाळ्यात जेमतेम झालेल्या पावसाने परतीच्या प्रवासात मात्र जनजीवन विस्कळित केले आहे. दिवाळीसारख्या ऐन सणासुदीच्या दिवसांत अरुण टेकाळे आणि मंदार टेकाळे या बापलेकाच्या झालेल्या दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.