Tue, Aug 11, 2020 21:22होमपेज › Marathwada › नांदेड : कर्जाला कंटाळून बाप- लेकाची आत्महत्या 

नांदेड : कर्जाला कंटाळून बाप- लेकाची आत्महत्या 

Last Updated: Feb 15 2020 8:39AM

मयत केरबा केंद्रें आणि शंकर केंद्रेंमाळाकोळी (नांदेड) : पुढारी वृत्तसेवा 

येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या असलेल्या वागदरवाडी (तालुका लोहा) येथे गुरूवारी दुपारीच्या सुमारास दोन वाजता पिता- पुत्राची शेतात असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली.

वाचा : बहुप्रतीक्षित रो-रो जहाज मुंबईत

या विषयी सविस्तर माहिती अशी की मयत पिता केरबा पांडू केंद्रें (वय 45, रा. वागदरवाडी) व मयत मुलगा शंकर केरबा केंद्रें (वय १७) या दोघा पिता-पुत्राने  सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी सारख्या  योजना, पूरग्रस्तांना अनुदानाचे वाटप केले जात असताना सुद्धा अनेक शेतकरी कर्जबाजारीपणा व सततची नापिकीला कंटाळून आत्महत्या करत आहेत. या घटनेनंतर कुटुंबाच्या नातेवाईकांनी राज्य शासनाची मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

वाचा : शरद पवारांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काय म्हणाले?

पिता-पुत्राच्या पाश्चात्य आई, पत्नी असा परिवार आहे. केरबा पांडू केंद्रें यांच्या आई 100 वर्ष वयाच्या असून या कुटुंबाला लवकरात लवकर आर्थिक मदत करण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माळाकोळी पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कराड एस. एस. हे करीत आहेत.