Sat, Jul 04, 2020 01:34होमपेज › Marathwada › कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Published On: Jul 18 2019 9:20PM | Last Updated: Jul 18 2019 9:19PM
रेणापूर : प्रतिनिधी 

सततचा दुष्काळ, नापीकी व कर्जाचा वाढलेला बोजा याला कंटाळून बीटरगाव (ता. रेणापूर ) येथील शेतकऱ्याने गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  स्वत: च्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हनमंत संतराम मेकले (वय ४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  

कामखेडा ( ता. रेणापूर ) येथील हनमंत मेकले यांना कामखेडा शिवारात तीन एकर जमीन आहे. याच जमिनिवर त्यांचा प्रपंच चालत होता. या जमिनीवर त्यांनी गावातील विविध कार्यकारी सेवा संस्थेकडून एक लाखाचे पीककर्ज घेतले होते.  सततचे अवर्षण व दुष्काळ यामुळे शेतीचे उत्पन्न घटले होते. त्यात संस्थेच्या कर्जाचे व्याज वाढत गेले. शेतीच्या उत्पन्नावर मुलांच्या शिक्षणासाठी व घरखर्चाचा भार पेलवत नसल्याने त्यांना खासगी सावकाराकडूनही  कर्ज काढावे लागले.  संस्थेचे व सावकाराचे जवळपास दहा लाखांचे कर्ज होते.  हे कर्ज फेडणे शक्य नसल्यामुळे हनमंत मेकले यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे नातेवाइकांनी सांगितले. 

हनमंत मेकले यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, सततचे अवर्षण, घटलेले अत्पादन व वाढत चाललेला कर्जाचा बोजा आपण फेडू शकत नाही. याला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.