Fri, Sep 25, 2020 16:09होमपेज › Marathwada › खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच करू : बाळासाहेब थोरात

खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागतच करू : बाळासाहेब थोरात

Last Updated: Dec 08 2019 7:04PM
संगमनेर : विशेष प्रतिनिधी

भाजपमध्ये नाराज असलेले नेते एकनाथ खडसे यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही. त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून राज्यात चांगले काम केले आहे. त्यांनी काँग्रेससोबत येण्याची इच्छा व्यक्‍त केली, तर त्यांचे आम्ही निश्‍चितच स्वागत करू, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्‍त केले.                                               

नागरी सत्कार सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाजपने सरकार स्थापन करून मोठी चूक केली होती. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर सुरू झालेली राजकीय उलथापालथ थांबण्याची चिन्हे नाहीत. भाजपमधील काही महत्त्वाचे नेते नाराज असल्याचे चित्र आहे. यामध्ये एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचा समावेश आहे. एकनाथ खडसेंचा आम्ही सर्व आदर करतो. त्यांनी भविष्यात काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला, तर  आम्ही त्यांचे निश्‍चित स्वागतच करू.

 "