Tue, Oct 20, 2020 10:53होमपेज › Marathwada › कॅबिनेट बैठकीत शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय घेणार

कॅबिनेट बैठकीत शेतकर्‍यांच्या मदतीचा निर्णय घेणार : धनंजय मुंडे

Last Updated: Oct 18 2020 4:50PM

पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना मंत्री धनंजय मुंडेमाजलगाव : पुढारी वृत्तसेवा 

परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांची पूर्णतः वाताहत झाली आहे. ज्या-ज्या ठिकाणी मी पाहणी केली, त्या ठिकाणचे सोयाबीन, कापुसासह आंतरपिक ही हातची गेली आहेत. यामुळे शेतकर्‍यांना तात्काळ मदत देण्याबाबत आमचं सरकार बुधवारी होणार्‍या मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मागील महिनाभरापासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे व त्यातच परतीच्या पावसाने शेतकर्‍यांची पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी बीड जिल्ह्याचा दौरा केला. या दरम्यान माजलगाव तालुक्यातील तालखेड, फुलेपिंपळगाव, नित्रुड येथील शेतात जावून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी आ.प्रकाश सोळंके, जि.प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, जयदत्त नरवडे, बाजार समितीचे सभपती संभाजी शेजुळ, डॉ.वसिम मनसबदार, भागवत खुळे, उपविभागीय अधिकारी गायकवाड, तहसिलदार वैशाली पाटील, तालुका कृषीअधिकारी संगेकर आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री मुंडे यांनी शेतात जावून नुकसान झालेल्या सोयाबीन, कापुस, तूर आदी पिकांची पाहणी केली. शेतकर्‍यांनी पावसामुळे होता-तोंडाशी आलेल पिकाचा घास हिरावून घेतल्याचे सांगत आम्हाला तात्काळ मदत द्या. रब्बीच्या पेरणीसाठी आम्हाकडे पैसा नाही असे उदिग्न होवून समस्या मांडल्या. यावेळी शेतकर्‍यांना धिर देत मंत्री मुंडे म्हणाले, काळजी करू नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे, लवकरच मदती संदर्भात निर्णय घेण्यात येईल. पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे ही केले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना सरसकट मदत देण्याबाबत बुधवारी होणार्‍या राज्याच्या मंत्रीमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. आणेवारी बाबत शेतकर्‍यांनी काळजी करण्याची गरज नाही.  शेतकर्‍यांना पिक विमा मिळावा याकरिता प्रशासनाने केलेले पंचनामेच ग्राह्य धरण्याचे मागणी आम्ही विमा कंपन्याकडे करणार आहोत. यामुळे विम्याची मदतीच्या माध्यमातून ही शेतकर्‍यांना आधार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

वाचा :शेतकऱ्यांनो, संकटावर एकजुटीने मात करु : शरद पवार 

वाचा :शेतकऱ्यांच्या नुकसान प्रकरणी शरद पवार पंतप्रधानांची भेट घेणार

 "