Wed, Aug 12, 2020 04:06होमपेज › Marathwada › बीड : परळीत पोलिसांच्या मदतीसाठी एसआरपी जवान!

बीड : परळीत पोलिसांच्या मदतीसाठी एसआरपी जवान!

Last Updated: Apr 08 2020 10:37AM

संग्रहित छायाचित्रपरळी : पुढारी वृत्तसेवा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्हाभरात संचारबंदी लागू आहे. संचारबंदी शिथिल कालावधी दरम्यान काही नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसून याकरिता पोलिस प्रशासनाच्या मदतीसाठी आता परळीत एसआरपी प्लाटून तैनात करणार येणार असल्याची माहिती अंबाजोगाई उप विभागाचे पोलिस उपअधीक्षक राहुल धस यांनी दिली आहे. दि. ८ एप्रिलपासून लॉकडाऊन दरम्यान एसआरपीचे पथक शहरात असणार आहे.

वाचा - बीड : सॅनिटायजर, मास्कचा मोठा साठा जप्त

लॉकडाऊन दरम्यान परळीत संचारबंदी लागू कारण्यात आलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना काही वेळेत सुरू आहेत. या वेळेत नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सोशल डिस्टन्सिंग पाळणे अनिवार्य आहे. असे असतानाही काही जण हे नियम तोडत आहेत शिवाय विनाकारण रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत. अशा सर्व बेशिस्त नागरिकांना पोलिस प्रशासन कारवाई करत आहे. आता परळी पोलिसांच्या मदतीला एसआरपी प्लाटून आजपासून असणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

वाचा - बीडमध्येही कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ