Mon, Mar 08, 2021 17:47
कोरोना अपडेट : बुलडाण्यात आज  ४१६ नवे पॉझिटिव्ह 

Last Updated: Feb 23 2021 6:00PM

बुलडाणा : पुढारी वृत्तसेवा 

जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाबाधितांच्या आकड्याच वाढच होत आहे. आज मंगळवार (दि.२३) ला जिल्ह्यात ४१६ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत १६,९१२ कोरोना रूग्ण आढळलेत यातील १४,८२२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. सद्या १६२३ रूग्ण उपचारासाठी दाखल आहेत. तर १८७ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. ५०३० संशयित रूग्णांच्या तपासणीचे अहवाल प्रयोगशाळेकडून  प्राप्त व्हावयाचे आहेत. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली.