परभणी : पुढारी वृत्तसेवा
देशात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातही रुग्ण वाढतच आहेत. परभणीमध्ये मुंबई, पुण्याहून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिंतुर तालुक्यातील सांवगी भांबळेस परतलेल्या कोरोनाबाधीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यास दुजोरा दिला आहे.
मुंबई, पुण्याहून आपल्या मुळ गावी परत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्मांची संख्या वाढत आहे.