Mon, May 25, 2020 19:39होमपेज › Marathwada › अकोल्यात टेन्शन वाढलं; नवे ४ जण पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या १३ वर

अकोल्यात टेन्शन वाढलं; नवे ४ जण पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या १३ वर

Last Updated: Apr 10 2020 3:39PM

संग्रहित छायाचित्रअकोला : पुढारी वृत्तसेवा

अकोला जिल्ह्यात काल गुरुवारपर्यंत अकोला शहरातील २ व पातूर शहरातील ७ अशी ९ कोरोनाबाधीत रुग्ण होते. मात्र आज सकाळी मिळालेल्या चाचणी अहवालात बैदपुरा येथील रूग्णाच्या घरातील दोन महिला व दोन बालकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे रूग्णांची संख्या १३ वर पोहोचली आहे. अकोलेकरांना आता सतर्क राहण्याची गरज आहे.

वाचा :वाशिममध्ये पोलिसांकडून १७६ वाहने जप्त

शुक्रवारी सकाळी मिळालेल्या तपासणी अहवालात आणखी ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे ऊघड झाले. तर हे चारही रुग्ण बैदपुऱ्यातील आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गुरूवारपर्यंत ९ होती. शुक्रवारी यात ४ रूग्णांची भर पडली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली. आज शुक्रवारी सकाळी पॉझिटिव्ह ४ रूग्णांमध्ये दोन महिला व दोन  बालकांचा समावेश आहे. दरम्यान, आता या परिसरातील लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे.

वाचा : उस्मानाबाद : बाळाच्या पहिल्या वाढदिनाची रक्कम दिली मुख्यमंत्री सहाय्यता निधीला