Mon, Sep 21, 2020 12:04होमपेज › Marathwada › वाशिम: कार-कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वाशिम: कार-कंटेनरचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Last Updated: Jul 05 2020 12:47PM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा

चांडस  (जि. वाशिम, ता. मालेगाव) गावानजीक चारचाकी व कंटेनरची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात आई, वडिलांसह मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज (दि. ५) सकाळी साडेनऊ वाजता ही दुर्घटना घडली. किसनराव कड (वडील), जिजाबाई किसनराव कड (आई) व अमोल कड (मुलगा) अशी मृतांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की, कड कुटुंबिय काही कामानिमित्त बाहेर गावी चारचाकीने जात होते. मालेगाव तालुक्यातील चा चांडस गावानजिक त्यांची चारचाकी आली असता समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकली. या अपघातात किसनराव कड (वडील), जिजाबाई किसनराव कड (आई) व अमोल कड (मुलगा) यांचा जागीच मृत्यू झाला. 
 

 "