Sat, Aug 08, 2020 03:32होमपेज › Marathwada › बीड : माजलगावजवळ अपघातात मध्य प्रदेशचे तीन व्‍यापारी ठार

बीड : माजलगावजवळ अपघातात मध्य प्रदेशचे तीन व्‍यापारी ठार

Published On: Dec 15 2018 9:31AM | Last Updated: Dec 15 2018 10:14AM
माजलगाव (जि. बीड) : प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणारी कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून कारमधील तीन कापड व्यापाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील टाकरवन फाट्याजवळ घडली. सुरेश हरयानी, हेमंत राजपूत, रोहित (सर्व रा. इंदौर, मध्यप्रदेश) अशी अपघातात मृत्यू पडलेल्यांची नावे आहेत. ते कपड्याचे व्यापारी आहेत.

अपघातातील तीन व्यापारी इंदौरयेथून बीड येथील व्यापाऱ्यांकडे आले होते. दिवसभर त्यांची भेट घेऊन रात्री मुक्कामासाठी लातूर येथे जात  होते. अगढी, माजलगावमार्गे राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना त्यांची कार (क्र. एमपी ०९ पीपी ४६८३)  टाकरवन फाट्याजवळ आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. अपघाताची माहिती मृत व्यापाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असून ते माजलगावकडे रवाना झाले आहेत.