Wed, Aug 12, 2020 11:59होमपेज › Marathwada › भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद

भीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद

Published On: Jan 02 2018 11:55AM | Last Updated: Jan 02 2018 11:55AM

बुकमार्क करा
उमरगा/कळंब : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद उस्मानाबाद जिल्ह्यात उमटले आहेत. उमरगा आणि कळंब शहरात बंदचे आवाहन ‘सकल भीमसैनिकां’नी केले आहे. त्याला व्यापार्‍यांनीही प्रतिसाद दिला आहे.

भीमाकोरेगाव येथे शौर्यदिनानिमित्त अभिवादनासाठी गेलेल्या भीमसैनिकांच्या वाहनांवर दगडफेकीचे प्रकार घडले होते. त्यानंतर झालेल्या धुमश्‍चक्रीत एकाचा मृत्यूही झाला होता. या सर्व घटनेच्या निषेधार्थ सकल भीमसैनिकांनी एकत्र येऊन कळंब आणि उमरगा शहरात बंदचे आवाहन केले होते. सकाळी दहापासून या दोन्ही शहरात व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. शाळांनाही सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, काही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात बंदोबस्त ठेवला आहे.