Tue, Jun 02, 2020 03:50
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › बीड : आष्टीत औषध फवारणीसाठी आमदार धस उतरले रस्त्यावर

बीड : आष्टीत औषध फवारणीसाठी आमदार धस उतरले रस्त्यावर

Last Updated: Mar 28 2020 4:46PM
आष्टी (बीड) : पुढारी वृत्तसेवा  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आष्टी शहरात आज सकाळी सहा वाजल्यापासूनच नगरपंचायतच्यावतीने शहरात फवारणी करण्यात आली. यावेळी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी स्वतः रस्त्यावर येत ही फवारणी केली आणि नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन केले.

आष्टी नगरपंचायतीच्यावतीने कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. मध्यंतरी शहरात नागरिकांना हॅण्डवॉशचे वाटप करण्यात आले होते. तर आज संपूर्ण शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये प्रशासनाच्यावतीने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी फवारणी करण्यात आली. यावेळी आमदार सुरेश धस यांनी स्वतः प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांना घर न सोडण्याचे आवाहन केले.

भाजीमंडई भरणार नाही

याच वेळी आष्टी शहरात भरणारी भाजीमंडई ही विनाकारण गर्दी होत होती. त्यामुळे एकाच वेळी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत होते. याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी शहरात भाजीमंडई भरु न देण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला केलेल्या आहेत. तर शेतक-यांना आवाहन करताना आपला भाजीपाला हा सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच शहरात फिरुन विकावा. जेणेकरुन गर्दी टाळता येणे शक्य असल्याचे धस यांनी म्हटले आहे.