Mon, Sep 28, 2020 14:06होमपेज › Marathwada › न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्‍न 

न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्‍न 

Published On: May 22 2018 6:34PM | Last Updated: May 22 2018 6:34PMकळंब : प्रतिनिधी  

कळंब येथील न्यायालयाच्या आवारात  न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेचा कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद  करण्यात आला असुन, या प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी तात्काळ गजाआड केले आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, कळंब येथील दिवानी न्यायाधीश आनंद मुंडे हे  उन्हाळ्याची सुट्टी संपवुन दिनांक २० मे रोजी रात्री आठ वाजता एम एच ४४ बी १४०१ या चार चाकी मध्ये कळंब (जि. उस्मानाबाद)  न्यायालयच्या परिसरात आले होते. मुंडे हे त्यांच्या निवास्थानाकडे जात असताना पहारेकरी घुगे यांच्यासोबत बोलत थांबले होते. यावेळी अचानक  एक इंडिका कार न्यायालयाच्या परिसरात आली, यावेळी घुगे यांनी तुंम्हाला काय पाहिजे असे त्‍यांच्याकडे विचारना केली असता, गाडीतील काही लोक तुम्ही वकील असला म्हणून काय झाले असे म्हणत होते. त्यामुळे न्यायाधीश मुंडे हे गाडीतून खाली उतरून त्या गाडीजवळ जाऊन तुम्ही कोण आहात येथे कशाला आला आहात अशी विचारणा करू लागले. यावेळी गाडीच्या चालकाला याचा राग आल्यामुळे चालकाने गाडी थेट न्यायाधीश यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्‍न केला. परंतु न्यायाधीश तात्काळ बाजुला सरकल्यामुळे त्यांना काही दुखापत झाली नाही. यानंतर चालकाने गाडी वेगाने बाहेर नेत असताना पहारेकर्‍यांनी गाडी आडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचा वेग अधिक असल्यामुळे गाडी निघून गेली. ही गाडी जात असताना पहारेकर्‍यांनी गाडी चा नंबर  एम एच ०३ AW २८२१ हा पाहून नोट करून ठेवला. त्याच वेळी वकील संघाचे अध्यक्ष संदीप पवार हे तेथेच आले होते. त्यांनी सुद्धा ही चार चाकी बाहेर जाताना पाहिली. 

या संदर्भात न्यायाधीश आनंद मुंडे यांच्या फिर्यादी वरुन आकाश चोंदे यांच्यावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. यानंतर या घटनेतील आरोपीला पोलीसांनी तात्काळ गजाआड  केले आहे. या गाडी मध्ये आकाश चोंदे यांच्यासोबत आणखीन कोण व्यक्ती होते. याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जलील शेख करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. आकाश चोंदे याला वाशी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायाधीश यांनी त्‍याला २४ मे पर्यंत  पोलीस कोठडी सुनावली आहे.