Wed, Jan 20, 2021 08:19होमपेज › Marathwada › परभणी : मास्क न वापरणाऱ्यांकडून १२ हजार दंड वसूल

परभणी : मास्क न वापरणाऱ्यांकडून १२ हजार दंड वसूल

Last Updated: Jul 03 2020 3:01PM

संग्रहित छायाचित्रनगर परिषदेने उगारला कायद्याचा बडगा

जिंतूर (परभणी) : पुढारी वृत्तसेवा  

कोरोनाचे संक्रमण शहरात वाढत असताना आह. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी महसूल प्रशासन असो वा नगर परिषद वेळोवेळी ध्वनीक्षेपाद्वारे जनजागृती करत आहे. पण, काही नागरिक याचे भान न ठेवता शहरात मास्कचा वापर न करता बिधास्त फिरत आहेत. आज दि. ३ जलै रोजी नगरपरिषद जिंतूरच्यावतीने कायद्याचा बडगा उगारत जिंतूर शहरात जे नागरिक मास्क न लावता विनाकारण फिरत होते, त्यांचावर दंड आकारण्यात आला. आज ३९ नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई १ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. 

वाचा - मराठवाड्यात संख्या 8,000 हजारांवर

आजपर्यंत १२००० र. दंड वसूल करण्यात आला. यावेळी नगर परिषदचे कर्मचारी स्वच्छता निरीक्षक  एस. चाऊस, डी. वि. तळेकर, इंद्रजीत चाळके, विनोद सावंत, शिवानंद होणराव, अजीज जानेमीया, जी. डी. जोशी, रत्नभुषण हनवते, मौजुद पठाण, दशरथ अडणे, संजय बांडे, सिताराम कसबे, प्रांजल शेजावळे, वामन राठोड, रमेश घुगे, मंगेश तळेकर (कंत्राटी कर्मचारी) व अन्य कर्मचारी कार्यवाहीत सहभागी आहेत. ही आर्थिक दंडाची मोहीम अशीच सुरू ठेवणार असल्याची माहिती सालेह चाऊस यांनी दिली.