Tue, Feb 18, 2020 12:10होमपेज › Marathwada › उस्मानाबाद : चीनची युवती पीएचडी अभ्यासासाठी तेरमध्ये दाखल

उस्मानाबाद : चीनची युवती पीएचडी अभ्यासासाठी तेरमध्ये दाखल

Last Updated: Feb 14 2020 6:04PM

सिंचीआन युनिव्हरसिटीची विद्यार्थीनी झँग झिवोलीतेर  : नरहरी बडवे  

चीनमधील एक युवती पीएचडी अभ्यासासाठी तेरमध्ये आली आहे. चीन-भारत बुद्धीष्टचे कला व सांस्कृतिक संशोधनासाठी चीन देशातील बीजींग येथील सिंचीआन युनिव्हरसिटीची विद्यार्थीनी झँग झिवोली हीने उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे १४ फेब्रूवारीला येऊन विविध पुरातन मंदिरे, स्थळे यांची पाहणी केली.

वाचा :बेरोजगारांत संताप; २०१४ ला अर्ज भरून घेत, २०२० मध्ये पाठवले परीक्षा प्रवेश पत्र 

चीन देशातील बीजींग शहरातील सिचीआन युनिव्हरसिटीची विद्यार्थीनी झँग झिवोली ही चीन-भारत देशातील बुद्धीष्टचे कला व सांस्कृतिक या विषयावर संशोधन (पीएचडी) अभ्यासासाठी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे १४ फेब्रूवारीला आली होती. तिच्या समवेत चीनच्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाच्या लींगाली होत्या. तेरमध्ये त्यांनी कै. रामलिंगप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालय, त्रिविक्रम मंदीर, चैत्य ग्रहाला भेट देऊन पहाणी केली. यावेळी मकरंद लंकेश्वर, रविंद्र मिनीक्षी मनोहर, सुनिल लोणकर उपस्थीत होते.

वाचा :रितेश आणि जेनेलिया कोणाची मुलाखत घेणार?