Wed, Jul 15, 2020 23:22होमपेज › Marathwada › परभणी : येलदरी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

परभणी : येलदरी धरणात बुडून युवकाचा मृत्यू

Last Updated: Nov 17 2019 1:23AM

file photoपरभणी : प्रतिनिधी 

जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणात पाय घसरून पडल्‍याने युवकाचा मृत्‍यू झाला. ही घटना (गुरूवार) दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. नितीन चंद्रकात बानाटे (वय : 26) असे बुडून मृत्‍यूमुखी पडलेल्‍या युवकाचे नाव आहे. 

या विषयी अधिक माहिती अशी की, गुरूवार दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास परभणी येथील रहिवासी व सध्या जितूर येथे राहत असलेला नितीन चंद्रकांत बानाटे हा आपल्या मित्रांसोबत येलदरी धरण पाहण्यासाठी आला होता. दरम्‍यान धरणावर आले असता अचानक नितीनचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. दुर्दैवाने पाण्यात बुडून त्‍याचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी दुपारी 2 वाजता घडली. 

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्‍थानिकांच्या मदतीने नितीनचा पाण्यात शोध सुरू केला. या शोधमोहिमेत मृत नितीनचे प्रेत सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सापडले. नितीन हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या दुर्दैवी मृत्युच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मृत नितीनचे वडील चंद्रकांत बानाटे हे जिंतूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.