Sat, May 30, 2020 02:20होमपेज › Marathwada › वाशीम : आत परीक्षा अन् बाहेर सैराट'चा झिंगाट!

वाशीम : आत परीक्षा अन् बाहेर सैराट'चा झिंगाट!

Last Updated: Feb 17 2020 5:56PM
वाशिम : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्या विद्यमाने पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता पाचवी व आठवी करिता दर वर्षी घेण्यात येत असते. त्याच प्रमाणे या वर्षी आज फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ही परिक्षा राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, मानोरा जि.वाशिम येथे घेण्यात आली. यावेळी एकाच वेळी विद्यालयात खाली लग्न सोहळा व वरच्या मजल्यावर परिक्षा सुरु असल्यामुळे परिक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना त्रास झाला. 

अधिक वाचा : परळीत भाजप आणि मनसे कार्यकर्ते भिडले

प्रती वर्षी प्रमाणे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा येथे घेतली जात होती. तेव्हा तेथे एकाच वेळी लग्न आणि परिक्षा सुरू झाली. लग्न समारंभ असल्याने येथे बँड पथक जोरजोरात वाजत होते. यावेळी बँड पथकाच्या 'सैराट' मधील झिंगाट गीतावर तुफान डान्स सुरु झाला होता. या गोगांटामुळे  विद्यार्थ्यांना खुप मोठा त्रास झाला. त्यामुळे परिक्षार्थ्यांची खुप मोठी शैक्षणिक हाणी झाली असून ही परिक्षा पुन्हा शांत वातावरणात घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून होत आहे. 

अधिक वाचा : सीसीआय कापूस केंद्र शुक्रवारपासून बंद

या परिक्षेचे नियोजन जवळपास तीन महिने आधीपासुन सुरु असते तरि सुध्दा शिक्षण विभागाणे या परिक्षेला कोणत्याहि प्रकारे महत्व दिले दिसत नाही. त्याच दिवशी व त्याच वेळेला परिक्षा व लग्न एकाच इमारतीत घेणे हे कितपत योग्य आहे. यांना जर परिक्षेला महत्व द्यायचे असते तर लग्नाचे स्थळ दुसर्‍या ठिकाणी ठेवले असते किंवा परिक्षेचे स्थळ दुसर्‍या शाळेवर ठेवले असते. हे तालुक्याचे ठिकान असल्यामुळे या ठिकाणी दुसर्‍या अनेक शाळा आहेत. तरिही आयोजकांनी विद्यार्थ्यांचा कोणत्याही प्रकारे विचार केला नाही.

अधिक वाचा : उस्मानाबाद : रस्ता, गटारीच्या कामासाठी झोपा काढो आंदोलन (video)

परिक्षा केंद्रावर व आजुबाजूला २०० मिटर अंतरावर पुर्ण शांततेचे वातावरण असणे असा शासनाचा नियम असतांना या नियमाला पायदळी तुडवले आहे. या परिक्षा केंद्रावर ग्रामीण व शहरी भागातिल शाळेतील इयत्ता ८ वीमध्ये शिकणारे २०४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. मात्र हे परिक्षार्थी या लग्न सोहळ्यामुळे खुप गोंधळले होते. त्यामुळे त्यांचे खुप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुन्हा परिक्षा घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थी व पालक वर्गाकडून होत आहे.