Sat, Sep 19, 2020 10:43होमपेज › Marathwada › वाशिम : कंटेनरच्या धडकेत २ जण ठार 

वाशिम : कंटेनरच्या धडकेत २ जण ठार 

Last Updated: Sep 16 2020 6:49PM
वाशिम : पुढारी वृत्तसेवा

भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलवरील दोघांचाही घटनास्‍थळी मृत्‍यू झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हिंगोली मार्गावरील तामसाळा फाट्यानजीक घडली. 

मिळालेल्‍या माहितीनुसार देवराव विश्वास खाडे (वय. ३३ रा. धारकाटा) व समाधान किसन राऊत (वय. ४०, रा. आनंदवाडी अकोला नाका, वाशिम) हे दोघे कामानिमित्त मोटरसायकल क्र. ( Mh 28 bd 3127) वरून कामानिमित्त जात होते. दरम्यान समोरुन भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने (RJ 84 6036) मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत खाडे व राऊत या दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. 

अपघातस्थळी जमादार नंदकुमार सरनाईक यांच्यासह कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी कंटेनर जप्त केला. दरम्‍यान या अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाला असुन, त्याच्याविरुध्द गून्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. 

 "