Mon, Nov 30, 2020 12:59होमपेज › Marathwada › अन् शिक्षक उमेदवार बनियानवर लग्न संमारंभात...

अन् शिक्षक उमेदवार बनियानवर लग्न संमारंभात पोहोचले...

Last Updated: Nov 21 2020 6:41PM
वाशिम (मानोरा) : पुढारी वृत्तसेवा

कोण कशा पध्दतीने प्रसिध्दीत येईल हे आजच्या घडीला सांगता येणं तसे अवघडच म्‍हणावे लागेल. आता हेच पहा ना... उपेंद्र पाटील या शिक्षक उमेदवाराने विना अनुदानित शिक्षकांच्या व्यथांवर लक्ष वेधण्यासाठी शर्ट काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे हे उमेदवार चांगलेच प्रसिध्दीच्या झोतात आले. आता इतकी प्रसिध्दी मिळाल्‍यानंतरही त्‍यांनी चक्क लग्न संमारंभात सुध्दा विना शर्ट बनियनवरचं हजेरी लावून उपस्थितीतांचे लक्ष वेधले.

या शिक्षक उमेदवारांनी विना अनुदानित शिक्षकाच्या व्यथांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रथमत: विना शर्ट बनियानवरूनचं उमेदवारी दाखल केली. अतिशय वेगळ्या पध्दतीने उमेदवारी दाखल केल्याने ते प्रसिद्धीच्या झोतात आले. दि. २० रोजी अमरावती येथे प्रचाराला जाताना आपल्या विना अनुदानित सहकारी शिक्षकाच्या मुलीच्या लग्न समारंभात त्‍यांनी शर्ट काढून हजेरी लावली. शर्ट काढून वधू वरास शुभेच्छा देताना त्‍यांनी उपस्‍थितांचे लक्ष वेधले.

अनेकांनी हा प्रकार पाहिल्यावर कारण विचारले असता, हाती माईक घेऊन विनाअनुदानित शिक्षकांच्या व्यथा काय असतात यावर मत मांडताच उपस्‍थितांचे डोळे पानावले. विना अनुदानित शिक्षकाच्या मुलीचा विवाह अतिशय  मोजक्याच पाहूण्याच्या उपस्‍थित पार पडल्याने विना पगारी शिक्षकांच्या व्यथा काय असतात याचे वास्‍तव समोर आले.