Sun, Jul 12, 2020 18:09होमपेज › Marathwada › बनावट औषधी प्रकरणात दोघांना पोलिस कोठडी

बनावट औषधी प्रकरणात दोघांना पोलिस कोठडी

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 21 2018 10:41PMपरभणी : प्रतिनिधी

बनावट औषधी व पिकांना लागणार्‍या इतर कीटकनाशकांच्या कंपन्यांचे बनावट लेबल लावल्या प्रकरणी एक पुरुष व एक महिला अशा दोघांंविरुध्द 20 जुलै रोजी रात्री उशिरा नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 21 जुलै रोजी पोलिसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भागोजी चोरमले, पोलिस उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, किशोर नाईक, हनुमंत जक्केवाड, शाम काळे, अरुण पांचाळ, भगवान भुसारे, सारिका धोतरे, यशवंत वाघमारे, रवींद्र भुमकर, विशाल वाघमारे, हरी खुपसे, यावर शेख, कांबळे, संयज घुगे, आशा सावंत यांच्या पथकाने 20 जुलै रोजी शहरातील खानापूर फाटा परिसरात ताडकळस रोडवर पत्र्यांच्या शेडमध्ये असलेल्या या बनावट औषध कारखान्यावर छापा मारला.

त्या ठिकाणी त्यांना रसायने, ग्रॅन्युवल्स लेबल्स, पॅकिंग लेबलिंगचे साहित्य असा एकूण 28 लाख 76 हजार 910 रुपयांचा साठा आढळून आला. अधीक्षक कृषी अधिकारी बालासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी राजेश खटकाळ, तालुका कृषी अधिकारी पी.बी.बनसोडे, मंडळ अधिकारी महेश बनकर, पं.स.चे कृषी अधिकारी शिसोदे, तंत्र अधिकारी दीपक नागुरे यांच्या पथकास पाचारण करण्यात आले.

त्या पथकाने केलेल्या तपासणीत हा सर्व प्रकार फसवणुकीचा असल्याचे आढळून आले. या प्रकरणी नवामोंढा पोलिस ठाण्यात कलम 420, 465, 468, 467, 471, 417, 482,474, 485,486,120 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात दोन आरोपींना अटक करून 21 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनील गोपिनवार, किशोर नाईक हे करीत आहेत.