Wed, Jul 08, 2020 06:52होमपेज › Marathwada › उमरगा : पावणे दोन कोटींच्या गैरव्यवहारातील 'त्या' दोन्ही फरार पालिका कर्मचाऱ्यांना अटक

उमरगा : पावणे दोन कोटींच्या गैरव्यवहारातील 'त्या' दोन्ही फरार पालिका कर्मचाऱ्यांना अटक

Last Updated: Jun 03 2020 10:49AM

संग्रहित छायाचित्रउमरगा (उस्मानाबाद) : पुढारी वृत्तसेवा 

उमरगा नगरपालिकेतील पावणे दोन कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणी फरार असलेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना उमरगा येथील राहत्या घरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. सूरज गोपीचंद चव्हाण, व सचिन सुधाकर काळे अशी अरोपींची नावे आहेत.  ३१ ऑगस्ट रोजी अपहाराचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तब्बल नऊ महिन्यानंतर मंगळवारी या दोघांना अटक करण्यात आली. नगर पालिकेतील पावणे दोन कोटी रुपयाच्या अपहार प्रकरणी सहा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, ३१ ऑगस्ट रोजी नगर पालिकेतील या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले होते. त्या गुन्ह्याचे टप्याटप्याने गूढ वाढत जाऊन तब्बल पावणे दोन कोटींचा अपहार झाल्याचे समोर आले. यानंतर त्यातील एक आरोपी स्वतः पोलिसाला शरण आला होता. मात्र मुख्य आरोपी फरारच होते. दरम्यान मंगळवारी (२ रोजी) आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष शेजाळ व त्याच्या पथकांनी या दोन आरोपींना अटक केली आहे.

उस्मानाबाद : उमरगा तालुक्यात दीड हजारापेक्षा अधिक लोक दाखल (video)

४९ लाखाचे अपहाराचे प्रकरण ३१ ऑगस्ट २०१९ ला उघडकीस आल्यानंतर शहरातील महाराष्ट्र बँकेत ठेवण्यात आलेल्या दलित वस्ती सुधार योजनेचे एक कोटी रक्कमेवरील ३६ लाख व्याजाची रक्कम हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या टप्प्यात लेखा विभागाच्या तपासणीत ८ लाख ६४ हजार ८०२ रक्कमेचा अपहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या पूर्वी इंटरनेट बँकिंग पद्धतीने ६६ लाख ४० हजार ४९६ रुपयाच्या अपहाराचे प्रकरण उघडकीस आले. तर पुन्हा  पाचव्या टप्प्यात १४ लाख रुपयेचा अपहार झाल्याची माहिती उघड झाल्यानंतर दलित वस्तीच्या निधीत अपहार झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान पालिकेत एकूण पाच टप्प्यात उघडकीस आलेल्या अपहाराच्या रक्कमेने पावणेदोन कोटीचा टप्पा गाठला. मात्र या प्रकरणातील सहा आरोपी पैकी एक आरोपी धम्मपाल ढवळे पोलिसांना शरण आला. त्यानंतर त्याने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दहा लाखाचा भरणा केल्यानंतर त्याचा जामीन मंजूर झाला. तर यातील दोन आरोपी सूरज गोपीचंद चव्हाण, व सचिन सुधाकर काळे यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. तर इतर तीन आरोपी फरार आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे असून उस्मानाबाद पथकातील पोलिस शरद घुगे, नदीम पठाण, बलसुरे आदींनी आरोपींना अटक केली.

पालिकेतील अपहाराने कळस गाठला आहे.  या बाबतीत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विधिमंडळात हा प्रश्नलेखा विभागाने केलेल्या चौकशी चार टप्पात एकुण पावणे दोन कोटींचा अपहार झाल्याचे उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी समितीतील मूख्याधिकारी प्रकाश पाटील, लेखापाल अंकुश माने, नगर अभियंता रविंद्र सोनवणे, हरिषकुमार दाडगे यांनी उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे पुरवणी चौकशी अहवाल  सादर केला होता.