Mon, Jul 06, 2020 17:05होमपेज › Marathwada › पाथरी तालुक्‍यात आगीच्या दोन घटना, लाखोंचे नुकसान

पाथरी तालुक्‍यात आगीच्या दोन घटना, लाखोंचे नुकसान

Published On: Apr 28 2019 6:38PM | Last Updated: Apr 28 2019 6:38PM
पाथरी  : प्रतिनिधी

पाथरी शहरातील माजलगाव रोडवरील बाबा इन्टरप्रायजेसला दि.२८ एप्रिल रविवार दुपारी २;३० वाजण्याच्या सुमारास शार्ट सर्किट होउन अचानक आग लागली. या आगीमध्ये सव्वा लाख रुपयाचे गाद्या बनवण्याचे साहित्य जळून खाक झाले.

याविषयी अधिक माहिती अशी की, पाथरी शहरातील बाबा इन्टरप्रायजेसला आज दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यावेळी पाथरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

दरम्‍यान तालुक्यातील रेणापूर शिवारातील वसत नगर ताडा येथे दुपारी १:१५ मिंटांच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत श्रीमंत किसन राठोड या शेतकऱ्यांचा कडबा जळाल्याची घटना घडली. येथे ही पाथरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडीने आग ताबडतोब विझवल्याने ताड्यावरील इतर होणारी मोठी हानी टळली आहे.

शहरातील माजलगाव रोडवरील नसरुल्ला खान आसरफ खान याचे बाबा इन्टरप्रायजेस गादीघर आहे. दि २८ एप्रिल रविवार रोजी दुपारी २;३० वाजता शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत गादी कपडा, पाढरी रुई, रगीत रुई पार्टीशन जळुन खाक होऊन सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. पाथरी नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या शारेफ खान, खुर्रम खान, शेख शेरु अविनाश वाढेकर यांनी आटोक्यात आणली. यामुळे पुढील मोठ्या प्रमाणात होणारी हानी टळली आहे.