Tue, Jun 15, 2021 11:26होमपेज › Marathwada › नांदेड : पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन!

नांदेड : पैनगंगा अभयारण्यात पट्टेदार वाघाचे दर्शन!

Last Updated: Oct 09 2019 3:34PM

पैनगंगा अभयारण्याच्या बिटरगाव वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या कॅमेराने टिपलेला वाघाचे छायाचित्र   उमरखेड (नांदेड) : प्रशांत भागवत

तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य अंतर्गत बिटरगाव वनपरिक्षेत्रातील मसलगाच्या जंगलात अकोली कक्ष क्रमांक ४८८ मध्ये पट्टेदार वाघाचे पहिल्यांदाच दर्शन झाले आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्याच्या ट्रॅपमध्ये वाघ हा चित्रीत झाला आहे. तीन दिवसापूर्वी सायंकाळी शिकारीच्या शोधात असलेला हा पट्टेरी वाघ आढळळ्याचे बिटरगाव येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच . गोरे यांनी सांगितले. 

अभयारण्यात मोठ्या प्रमाणावर बिबटे, रानडुक्कर आदी वन्य प्राणी  आहेत. अधूनमधून अभयारण्यात पट्टेरी वाघाचे वास्तव्य असल्याची चर्चा होत होती. परंतु त्याला दुजोरा आजपर्यंत मिळाला नव्हता.  अभयारण्यात याच वर्षी पहिल्यांदाच विविध ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते. दरम्यान, रविवारी (दि. ६) मसलगाजंगलातील अकोली बीडमधील कक्ष क्रमांक ४८८ मध्ये सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पट्टेरी वाघाचे दर्शन झाले. 

कॅमे-यात स्पष्ट दिसणारा वाघ हा अत्यंत परीपक्व व पुर्ण वाढ झालेला दिसून येत आहे. अभयरण्यातील वाघाच्या वास्तव्याने व्याघ्र संवर्धनाला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाघाच्या वास्तव्याने जंगल काठच्या गावांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.