Tue, Jul 07, 2020 00:05होमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत तीघे ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत तीघे ठार

Published On: May 21 2019 9:53PM | Last Updated: May 21 2019 9:53PM
वडवणी : प्रतिनिधी 

नातेवाईकाचा लग्न सोहळा आटोपुन परत निघालेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तीघा जणांचा मृत्यू झाला. यात दुचाकी चालकासह त्याची पत्नी व मुलगी जागीच ठार झाली. गणेश कैलास राठोड (वय ३६), पत्नी शोभा (३३) व मुलगी रोशन (१०) अशी मृतांची नावे आहेत. तर एक मुलगा गंभीर जखमी झाला. आज, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास बीड परळी महामार्गावरील ब्रम्हनाथ तांड्यासमोर ही घटना घडली.

सुंदर नगर तांडा  रेणापुर, ता. पाथ्री जि. परभणी येथील गणेश कैलास राठोड हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वडवणी तालुक्यातील उपळी येथे लग्न समारंभासाठी मोटारसायकलने आले होते. दुपारी लग्न समारंभ आटोपुन उपळी येथुन आपल्या गावी सुंदरनगर तांडा रेणापुर कडे जात असताना बीड परळी राज्यमहामार्गावरील ब्रम्हनाथ तांड्या जवळ एका अज्ञात वाहनाने राठोड यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघात तीघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा लहान मुलगा गंभीर झाला.  

घटनेची माहिती मिळताच वडवणी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश खाडे हे आपल्या सहकार्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  मृतांची ओळख पटताच मृतदेह शवविच्छेदनासाठी कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.