Thu, Sep 24, 2020 10:09होमपेज › Marathwada › बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब

बीड : टीईटी परीक्षेत गोंधळ; उत्तराचे पर्याय गायब

Last Updated: Jan 20 2020 2:45PM

संग्रहित छायाचित्रपरळी वैजनाथ : रविंद्र जोशी

राज्यात काल रविवारी (दि.१९) जवळपास ३ लाख विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली. या परीक्षेत गंभीर चूका असल्याची बाब आता समोर आली आहे. यंदा पेपरमध्ये योग्य जोड्या जुळवा, असा प्रश्न देण्यात आला होता. मात्र उत्तराचे पर्यायच देण्यात आले नव्हते. तसेच टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मराठी शुद्धलेखनाच्या गंभीर चुकाही समोर आल्या. त्यामुळे आता विद्यार्थी वर्गात नाराजी पसरली आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून या चुकीच्या प्रश्नांचे गुण मिळावेत, अशी मागणी केली जात आहे.

अधिक वाचा : बीड : सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची आत्महत्या

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षक पात्रता परिक्षा घेण्यात येते. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या अनुदानित विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक नियुक्तीसाठी उमेदवारांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यावेळी ही परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आली. पहिला पेपर सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत होता. त्यानंतर दुपारी २ ते ४.३० या वेळेत दुसरा पेपर घेण्यात आला. या परीक्षेसाठी मागील महिन्यात ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.

अधिक वाचा : 'चव्हाणांच्या गौप्यस्फोटामुळे शिवसेनेचा खरा चेहरा उघड'

टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मराठी शुद्धलेखनाच्या गंभीर चुका दिसून आल्या आहेत. मागील वर्षी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेतही प्रश्नपत्रिकेत अशाच चुका असल्याचं समोर आल्या होत्या. परंतु त्यावेळी विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले नव्हते. मात्र यावर्षी  गुण देण्यात यावे अशी मागणी परीक्षार्थींनी केली आहे. दरम्यान शिक्षकांसाठीच्या परिक्षेतच  भाषेची एवढी अनास्था असेल तर भाषा संवर्धन होणार कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 "