Fri, May 07, 2021 18:58
क्राईम : शरीर-प्रेम संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली हत्या 

Last Updated: May 04 2021 4:02PM

बीड ः पुढारी ऑनालईन 

गेवराई तालुक्यातील तलवाडातील राजापूरच्या शेतात एका तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या सापडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या चेहऱ्यावर आणि गळ्याभोवती घातपाताचे व्रण दिसून आले आहेत. पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केल्यानंतर फक्त २४ तासांत आरोपींना ताब्यात घेण्यात यश आलं आहे. संबंधित तरुणाची हत्या अनैतिक संबंधातून झाली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

वाचा ः क्राईम : पत्नीची छेड काढणाऱ्या मोठ्या भावाची दृश्यम स्टाईलने हत्या; पत्नीच्या व आईच्या मदतीने घरामागेच पुरला होता मृतदेह

मृत व्यक्तीचे नाव ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण असे असून त्याचे वय ३२ वर्षे आहेत. तो गेवराई तालुक्यातील गोळेगावमधील रहिवासी आहे. ज्ञानेश्वराचा मृतदेह राजापूरच्या शेतात सापडला होता. तसेच त्याच्या चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या, तर गळ्याभोवती व्रण असल्याचे दिसून आले. याप्रकरणी ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरची हत्या ही अनैतिक संबंधातून झाली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आली आहे. 

वाचा ः मृत्यूचा थरार! लेडी डाॅन पिंकी जिवाच्या आकांताने धावत होती अन् गुंडांची टोळी तिच्या पाठीवर सपासप वार करत होती, शेवटी...

पोलिसांनी सांगितल्यानुसार मृत ज्ञानेश्वरला दोन बायका होत्या. त्याच्या पहिल्या बायकोचे म्हणजे नाना आप्पा शिंदे यांच्याशी अनैतिक संबंध सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. परंतु, त्यात ज्ञानेश्वर हा दोघांच्या प्रेमसंबंधात अडचणीचा ठरत होता. त्यामुळे ज्ञानेश्वरच्या पहिल्या पत्नीने आणि तिच्या प्रियकरने ज्ञानेश्वरचा काटा काढायचा ठरवला. त्या दोघांनी हत्येचा कट रचला आणि निर्घृण हत्या केली. दोघांनी ज्ञानेश्वराची हत्या केली आणि मृतदेह शेतात टाकला.