Mon, Jul 06, 2020 18:20होमपेज › Marathwada › बेपत्ता विद्यार्थ्याचा अंबाजोगाई शहरात मृतदेह आढळला 

बेपत्ता विद्यार्थ्याचा अंबाजोगाई शहरात मृतदेह आढळला 

Published On: Mar 31 2019 12:02PM | Last Updated: Mar 31 2019 12:02PM
अंबाजोगाई : प्रतिनिधी 

अंबाजोगाई शहरातील बलुतेचा मळा भागातील विहीरीत एका विद्यार्थ्याचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. प्रतीक वसंत मसने असे या मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. प्रतीक हा काही दिवसापासून बेपत्ता होता. 

प्रतीक हा योगेश्वरी माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होता. काही दिवसापूर्वीच १० वीच्या परीक्षा संपल्या आहेत. तर मागील दीड वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. प्रतीक हा काही दिवसापासून बेपत्ता झाला होता. शहर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार देखील करण्यात आली होती. मात्र आज सकाळी बलुतेचा मळा भागातील विहिरीत प्रतीकचा मृतदेह आढळून आला. ज्या विहिरीमध्ये मृतदेह आढळून आला आहे त्या जवळच त्याचे घर आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे तपासामध्ये उघड होणार आहे. या घटनेचा अधिक तपास शहर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल कुलकर्णी करत आहेत.