Thu, Jul 02, 2020 18:27होमपेज › Marathwada › जालन्यात एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

जालन्यात एकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Published On: Sep 23 2019 7:45PM | Last Updated: Sep 23 2019 7:45PM

वंदन अशोक धरमशी सुखापुरी : प्रतिनिधी

अंबड शहरातील चांगलेनगर येथील रहिवासी वंदन अशोक धरमशी याचा शहापूर (जि.ठाणे) येथे पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.  रविवारी (दि.२२) ही घटना घडली. तो हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांसह धार्मिक कार्यक्रमासाठी शहापूर (जि.ठाणे) येथील मंदिरात गेला होता. त्यावेळी जवळ असलेल्या धबधब्याजवळ ५ ते ६ मित्रांसह गेला असता त्याचा पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला.

वंदन हा वृत्तपत्र वितरक अशोक धरमशी (शहा) यांचा मुलगा होता. वंदन मागील ३ वर्षांपासून उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे राहत होता. तो सोमय्या कॉलेजमध्ये बी. एम. ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. अत्यंत हुशार, शांत व अभ्यासू तसेच मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे सर्व मित्र परिवारासह शिक्षकातही शोककळा पसरली आहे.  

त्याच्या पश्चात आजी, आई, वडील, बहीण, काका-काकू, आत्या, चुलत भाऊ, चुलत बहिणी असा मोठा परिवार आहे. व्ही.एल. डी.इंग्लिश स्कूलचे संचालक तथा सर्व अंबड तालुका व शहर वर्तमानपत्राचे वितरक जयेश धरमशी (शहा) व सुरेश धरमशी(शहा) यांचा तो पुतण्या होता. त्याच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.