होमपेज › Marathwada › एकाच कुटूंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, मायलेकीचा मृत्यू 

एकाच कुटूंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न, मायलेकीचा मृत्यू 

Published On: Nov 22 2018 3:03PM | Last Updated: Nov 22 2018 3:03PMहिंगोली : पुढारी ऑलनाईन

हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीवरील जुन्या पुलावरून एकाच कुटूंबातील तिघांनी पाण्यात उड्या टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत मायलेकीचा बुडून मृत्यू झाला तर एकास वाचविण्यात कनेरगाव येथील ग्रामस्थांना यश आले. ही घटना गुरूवारी (दि.२२) सकाळी ९.३० च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील विठ्ठल अमृतराव नायक (वय ६०), शकुंतला विठ्ठलराव नायक (वय ५५), उमा देशमुख (वय २५) (तिघे राहणार पानकनेरगाव) या तिघांनी घरगुती वादातून गुरूवारी सकाळी ९.३० च्या सुमारास कनेरगाव नाका येथील पैनगंगा नदीच्या जुन्या पुलावरून नदीत उड्या घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये शकुंतला नायक व उमा देशमुख यांचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार शेजारील नागरीकांच्या लक्षात येताच नदीकडे धाव घेवून विठ्ठलराव नायक यांना ग्रामस्थांनी वाचविले. 

यासाठी गावातील कैलास गावंडे, गजानन गावंडे, पंकज पोखरे यांनी पुढाकार घेतला. या घटनेची माहिती मिळताच कनेरगाव नाका चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून दोन्ही महिलांचे मृतदेह नदीबाहेर काढण्याचे काम सुरू होते. एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात दोघांचा मृत्यू झाल्याने सवना येथे हळहळ व्यक्‍त होत आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.