Tue, Jul 07, 2020 09:11होमपेज › Marathwada › नांदेड :१४ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

नांदेड : शालेय विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या

Last Updated: Dec 03 2019 4:55PM

घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसनांदेड : प्रतिनिधी

लासीना (जि. हिंगोली) येथील शालेय विद्यार्थ्याचा मृतदेह विदर्भातील भांबरखेडा (जि. यवतमाळ) येथे पुरलेला आढळून आला. संतोष शंकर डांगे (वय १४, रा. लासीना, जि. हिंगोली) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणाचा पोलिस तापास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष शंकर डांगे हा दि. २ डिसेंबरला सकाळी ८ वाजता शाळेस जाण्यासाठी निघाला होता. परंतु, तो सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने पालकांनी कळमनुरी पोलिस स्टेशनला अपहरण झाल्याबाबतची तक्रार दिली. मुलाचा शोध घेण्यात आला. रात्रभर तो कोठेही आढळून आला नाही. ३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता भांबरखेडा शिवारातील ग्रामस्थांना रोडच्या बाजुला असलेल्या दुरसंचारच्या केबलसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामध्ये मुलाचे संपूर्ण शरीर पुरलेले पण पाय उघडा असल्याचे ग्रामस्थांना निदर्शनास आले. ग्रामस्थांनी ही बाब पोलिस पाटलांना सांगितली. व पोलिस स्टेशन पोफाळी यांना माहिती दिली. ठाणेदार कैलास भगत व पोलिस कर्मचारी घटनास्थळी आले. घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. घटनास्थळापासून काही अंतरावर शाळेचे दप्तर आढळून आले. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटण्यास मदत झाली. त्याआधारे पोलिस स्टेशन कळमनुरी येथे संपर्क साधला असता अपहरणाचा गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी विकास तोटावार, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरसकर व इतर सहकारी हजर झाले. तसेच यवतमाळ येथील श्वान पथक पाचारण करण्यात आले. मृतदेह जमिनीत गाडलेला असल्यामुळे उमरखेड व पुसद महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर मृतदेह खड्ड्याबाहेर काढण्यात आला.

यावेळी पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कळमनुरी पोलिस ठाणे यांना हस्तांतरीत करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.