Sat, Jul 04, 2020 05:05होमपेज › Marathwada › पाटोद्यातील पुरातन राममंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

पाटोद्यातील पुरातन राममंदिर जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

Published On: Mar 25 2018 1:25AM | Last Updated: Mar 25 2018 1:25AMपाटोदाः महेश बेदरे

भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या   पाटोदा शहरातील पुरातन राममंदिराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींच्या सततच्या उदासीनतेमुळे पाटोद्यातील हे राममंदिर अजुनही जीर्णोद्धाराच्या प्रतिक्षेत आहे.पाटोदा शहरात अनेक पुरातन मंदिरे आहेत. यामध्ये पाटोद्याचे ग्रामदैवत असलेल्या भामेश्वर महादेवासह संगमेश्वराचे अतिप्राचीन मंदीर आहे. या संगमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पूरातत्व विभाकडून 1 कोटी 54 लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून प्रत्यक्ष कामही झाले आहे. परंतु याच मंदिराला अगदी खेटूनच असलेल्या राम मंदिराची मात्र सध्या अत्यंत दुरवस्था झाली आहे. 

या मंदिराच्या भिंती पूर्णपणे पडल्या आहेत, मुख्य दरवाजा तर केव्हाच जमीनदोस्त झाला असून केवळ दरवाजाच्या खुणा शिल्लक आहेत. मंदिराला दरवाजाच नसल्यामुळे या ठिकाणी फिरस्त्या प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असतो. मंदिरावरील छतही केवळ नावापुरतेच आहे. यातील पत्रे गंज चढून  पूर्णपणे खराब झाले आहेत. त्यातच या मंदिरात साधी फरशीही नसल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी अक्षरक्षः चिखल होतो. 

मंदिराच्या एवढ्या दुरवस्थेमुळे भाविकही मंदिरात सहसा येत नाहीत केवळ वर्षातून एकदाच म्हणजे रामनवमीच्या दिवशीच या ठिकाणी काही प्रमाणात येतात. या मंदिराचे बांधकाम कऱण्यात यावे, फरशी टाकण्यात यावी  लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी भाविकांतून होत आहे

Tags : Marathwada, Marathwada News, The ancient Ram Mandir,  waiting for revitalization