Sat, Jul 11, 2020 19:12होमपेज › Marathwada › जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या एस. एस. टी पथकाने पकडली २ कोटींची रक्कम

जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या एस. एस. टी पथकाने पकडली २ कोटींची रक्कम

Published On: Mar 19 2019 11:04PM | Last Updated: Mar 19 2019 11:04PM
बीड : प्रतिनिधी 

जिल्ह्यात लोक सभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्थापित करण्यात आलेल्या स्थिर निगराणी पथक (एस एस टी) ने पाटोदा तालुक्यातील पांढरवाडी फाटा येथे आज एका मर्सिडीज बेंज कार मधून नेली जाणारी जवळपास  2 कोटीं पेक्षा जास्त रक्कम जप्त केली

 जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील बीड अमळनेर मार्गे अहमदनगर रोड वरील पांढरवाडी फाटा येथे अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मर्सिडीज बेंज कार क्रमांक एम एच 23 यु 2000 या वाहनात गोणी तसेच दोन बँगांमध्ये भरून ठेवून नेत असलेली रक्कम आढळून आल्याने एसएसटी पथक प्रमुख ए राख यांनी साक्षीदारांच्या समोर पंचनामा नंतर जप्त केली. सदर वाहनात कोणत्याही प्रकारचे निवडणूक प्रचार साहित्य आढळून आले नाही. नियमानुसार सदर रक्कम पुढील कार्यवाहीसाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे सदर वाहनावर पुढील काचेवर डाव्या बाजूस प्रेस असे लाल अक्षरात लिहिलेले आढळून आल आहे.

निवडणूक आचार संहिता कालावधीमध्ये सदर रक्कम सापडल्याने नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले आहे.