Thu, Jun 04, 2020 19:21होमपेज › Marathwada › बीडच्या पोलिस अधीक्षकांची ऑक्सफर्डमध्ये चर्चा!

बीडच्या पोलिस अधीक्षकांची ऑक्सफर्डमध्ये चर्चा!

Last Updated: May 23 2020 5:19PM

बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दारबीड : पुढारी वृत्तसेवा

युनायटेड किंगडम येथील विश्वविख्यात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वार्षिक पब्लिकेशनमध्ये बीड जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या कामगिरीचा उल्लेख करत लेख प्रकाशित केला आहे. 

यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील बीड जिल्ह्याच्या २०१९ मधील राज्य निवडणुका बीड पोलिसांनी उत्कृष्ट हाताळल्याबाबत विशेष प्रशंसा केली आहे. बीडचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सन २००९ मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत मास्टर ऑफ लॉ पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.