Tue, Jul 07, 2020 00:02होमपेज › Marathwada › लक्ष्मी पूजनानंतर चोरट्या कडून घरे टार्गेट

लक्ष्मी पूजनानंतर चोरट्या कडून घरे टार्गेट

Published On: Nov 08 2018 7:59PM | Last Updated: Nov 10 2018 1:13AMबीड: प्रतिनिधी

काल झालेल्या लक्ष्मी पूजनानंतर चोरट्याचा धुमाकुळ सुरु आहे. शहरातील पंचशीलनगर मागील नवीन सरस्वती विद्यालयासमोरील परिसरात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालत घरे टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. तर दोन घरातून एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. 

बीड शहरातील नवीन सरस्वती शाळे समोर राहणारे अशोक धर्मराज मांजरे यांनी बुधवारी रात्री लक्ष्मी पूजेनंतर सोन्याचे दागिने व रोख रक्कम समोरच्या खोलीत आणून ठेवली होती. चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या दाराचा कडीकोंयडा उचकडून सोन्याचे दागिने व नगदी रुपये असा एकूण ७९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

त्यानंतर चोरट्यांनी दशरथ भोसले यांच्या घरावर निशाणा साधला. यानंतर मंगेश शिंदे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडत घरात प्रवेश केला घरातील व्यक्ती जाग्या झाल्याने चोरट्यांनी घरातून पळ काढला. गिरीश शिंदे यांनी चोरांचा पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पळून गेले. चोरट्यांनी पुढे जात जिजाऊ नगर मधील विलास बळीराम शिंदे यांच्या घरात प्रवेश करत लक्ष्मी पूजनाकरता देवी समोर ठेवलेले दागिने व रोख असा ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल नेला. या सर्व चोऱ्या एकाच टोळी मार्फत झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.  दिवाळी दिवशीच असा प्रकार घडल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पीएसआय ढगारे करीत आहेत.