Sun, Sep 20, 2020 03:44होमपेज › Marathwada › जालना : मराठा आरक्षणासाठी राजेश टोपेंना घेराव  

जालना : मराठा आरक्षणासाठी राजेश टोपेंना घेराव  

Last Updated: Sep 17 2020 11:07AM
जालना : पुढारी वृत्तसेवा 

मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवावा म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने पालकमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. टाऊन हॉल स्थित हुतात्मा स्मारक परिसरात घोषणादेखील देण्यात आल्या.

कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुवारी हैदराबाद मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात हा प्रकार घडला. पोलिसांनी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, अशोक पडुळ आदींना ताब्यात घेतले आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. याप्रकरणी न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यात सरकार कमी पडल्याची भावना आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटना आंदोलनात उतरल्या आहेत. 

 "